Language
CBC चाचणी: सामान्य श्रेणी आणि कशा प्रकारे तयारी करावी?
Table of Contents
CBC चाचणी म्हणजे काय?
CBC चाचणी, ज्याला कम्प्लीट ब्लड काउंट (Complete Blood Count) असेही म्हणतात, एक अशी चाचणी आहे ज्यामध्ये तुमच्या रक्तातील वेगवेगळ्या पेशींच्या पतळीची गणना केली जाते. यामध्ये लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, हिमोग्लोबीन, आणि प्लेटलेट्स यांचा समावेश आहे. या चाचणीमुळे अशक्तपणा, रक्तातील संक्रमण, आणि ल्युकेमिया यासारख्या वेगवेगळ्या आजारांचे निदान केले जाऊ शकते. या चाचणीमुळे कॅन्सर, मधुमेह आणि एड्स यांसारख्या गंभीर आजार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यामध्ये देखील मदत होते.
जर तुम्ही अशी एक CBC चाचणी करून घेण्याचे ठरवले असेल तर काळजी करू नका. ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि अगदी कमी वेळात पूर्ण होणारी आहे. एक आरोग्य सेवा तज्ज्ञ एका सिरिंजच्या सहाय्याने तुमच्या रक्ताचा नमूना घेईल. हा नमूना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जाईल. या चाचणीचे परिणाम काही दिवसातच मिळतात.
CBC चाचणीचे उद्दिष्ट काय आहे?
CBC चाचणी तुम्हाला तुमच्या सर्वांगीण आरोग्याचे मूल्यांकन करून वेगवेगळ्या आजारांचे निदान करण्यात मदत करते. तुमच्या नियमित शारीरिक तपासणी दरम्यान किंवा तुमच्या रक्तपेशींना नुकसान पोहचवणाऱ्या अजरांची लक्षणे दिसू लागल्यास ही चाचणी करून घेण्यास सुचवले जाते. उदाहरणार्थ, जर तुमच्या शरीरात संक्रमणाची जसे ताप येणे, थकवा जाणवणे, किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून आली तर तुमचे डॉक्टर तुम्हाला CBC चाचणी करून घेण्याचा सल्ला देऊ शकतात. तुम्ही घेत असलेल्या औषधांचा तुमच्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी देखील ही चाचणी केली जाऊ शकते.
CBC चाचणीसाठी कशाप्रकारे तयारी करावी?
जर तुम्ही CBC चाचणी करून घेण्याचे ठरवले असेल तर विशेष अशी काहीच तयारी करायची गरज नाही. तरी, जर तुमच्या रक्ताचा नमूना इतर चाचण्यांसाठी देखील वापरला जाणार असेल तर तुम्हाला चाचणी करण्यापूर्वी 12 तास काहीही खाणे टाळावे लागेल. अशा परिस्थितीत, या 12 तासांमध्ये तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता. तुम्हाला ताण येईल असे कोणतेही काम तुम्ही या काळात करणे टाळावे. ही पथ्ये सहज पाळली जावीत यासाठी तुम्ही ही चाचणी झोपून उठल्यावर सकाळीच करणे कधीही सोयीचे ठरेल. तरी, तुमचे डॉक्टर तुम्हाला काहीही न खाता चाचणी करण्याबाबत आवश्यक सल्ला नक्कीच देतील.
CBC चाचणी करून घेत असताना तुमच्या डॉक्टरांना तुम्ही खालील मुद्दे सांगणे महत्त्वाचे आहे:
● तुम्ही गर्भवती असाल
● यापूर्वी कधी रक्तस्त्रावासंबंधी काही त्रास झाला असल्यास
● काही औषधे घेत असल्यास, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांव्यतिरिक्त कोणती औषधे आणि सप्लीमेंट्स घेत असल्यास
अशा प्रकारच्या रक्तचाचण्यांचा सर्वसाधारणपणे नियमित तपासणच्या वेळेसच सुचवल्या जातात. खरं तर ही सर्व प्रक्रिया अगदी झटपट आणि कमी खर्चात पूर्ण होते. तुम्ही कोणत्याही प्रयोगशाळेत जाऊ शकता किंवा तुम्हाला सोयीचे असलेल्या ठिकाणी रक्ताचा नमूना घेण्यासाठी आरोग्यसेवा तज्ज्ञांना तुम्ही त्या ठिकाणी बोलवू शकता.
या चाचणीच्या आधी कदाचित तुम्हाला काही औषधे काही काळासाठी बंद करावी लागू शकतात. तुमच्या वैयक्तिक परिस्थितीच्या आधारे तुमचे डॉक्टर तुम्हाला या चाचणीच्या तयारी संबंधी विशिष्ट सूचना नक्की देतील.
या चाचणीसाठी सर्वसाधारणपणे मोजमापन किती असावे?
सर्वसाधारण मापदंड व्यक्तीच्या वय आणि लिंगानुसार बदलू शकतात. साधारणपणे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये लाल रक्तपेशी जास्त प्रमाणात असतात, आणि वयस्क व्यक्तिंपेक्षा लहान मुलांमध्ये पांढऱ्या रक्तपेशी जास्त प्रमाणात असतात.
महिला आणि पुरुष यांमध्ये साधारणपणे आढळणारे मोजमापन खालील प्रमाणे आहे. तरी, या अकड्यांमध्ये फरक असू शकतो, आणि कोणत्याही गोष्टी गृहीत धारण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
हिमोग्लोबीन
पुरुष: 13.2 - 16.2 ग्रॅम/dL | महिला: 12.0 - 15.2 ग्रॅम/dL
लाल रक्तपेशींची संख्या Red Blood Cell Count (RBC)
पुरुष: 4.3 - 6.2 दशलक्ष/μL | महिला: 3.8 - 5.5 दशलक्ष/μL | शिशु/लहान मुले: 3.8 - 5.5 दशलक्ष/μL
पांढऱ्या रक्तपेशींची संख्या White Blood Cell Count (WBC) - वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या
● न्यूट्रोफिल्स - 35-80%
● लिम्फोसाईट्स - 20-50%
● मोनोसाईट्स - 2-12%
● इओसिनोफिल्स - 0-7%
● बेसोफिल्स - 0-2%
प्लेटलेट्सची संख्या (Plt) - 1.5-4.5 लाख/μL
हेमॅटोक्रिट (Hct)
पुरुष: 40-52% | महिला: 37-46% | लहान मुले: 31-43%
लाल रक्तपेशी वितरण रुंदी (RDW) - 35-47 fL
सरासरी कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम (MCV)
पुरुष: 82-102 fL | महिला: 78-101 fL
सरासरी कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबीन (MCH) - 27-34 pg
सरासरी कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबीन सांद्रता (MCHC) - 31-35 ग्रॅम/dL
सरासरी प्लेटलेट्स व्हॉल्यूम व्हॉल्यूम (MPV) - 6.0-9.5 fL
चाचणीचे असामान्य परिणाम म्हणजे काय?
जर तुमच्या चाचणीचे असामान्य परिणाम आले तर हे परिणाम तुम्हाला एखाद्या प्रकारचे संक्रमण झाल्याचे, अशक्तपणा, किंवा आनुवंशिक आजार असल्याचे संकेत असू शकते. CBC चाचणीचे असामान्य परिणाम येण्यामगचे कारण शोधण्यासाठी डॉक्टर तुम्हाला इतर काही चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात.
खाली काही परिमाण आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे परिणाम समजून घेऊ शकता:
● हिमोग्लोबिन: कमी झालेले हिमोग्लोबिन अशक्तपणाचा संकेत असू शकते,त्याचबरोबर वाढलेले हिमोग्लोबीन पॉलीसिथेमियाचे संकेत असू शकतात.
● पांढऱ्या रक्तपेशींची संख्या: पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी झाली असल्यास हे अप्लास्टिक एनीमिया, ल्युकेमिया, आणि स्वयंप्रतिकार रोग यांचे संकेत असू शकतात. वाढलेल्या रक्तपेशी ल्युकेमिया किंवा दाहक आजार/सूज येणाच्या विकाराचे संकेत असू शकतात.
● प्लेटलेट्स: कमी झालेले प्लेटलेट्स साधारणपणे सामान्य आजार जसे की डेंग्यु आणि मलेरियाचा संकेत असू शकतात.
निष्कर्ष
CBC चाचणी हे एक अत्यंत महत्त्वाचे निदानसूचक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या अरोग्याबद्दल मोलाची माहिती देते. जारी तुम्हाला स्वस्थ आणि निरोगी वाटत असले तरी तुमच्या नियमित आरोग्य तपासणीचाच एक भाग म्हणून वर्षातून एकदा तरी ही चाचणी करणे आवश्यक आहे. जर तुमच्या CBC चाचणीचे परिणाम सामान्य असतील, तर याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात. अचूक परिणामांसाठी, मेट्रोपोलिस हेल्थकेअर सारख्या नामांकित निदान प्रयोगशाळेतूनच ही चाचणी करणे महत्त्वाचे आहे. आमच्या शाखा संपूर्ण भारतात आहेत आणि इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही निदानसूचक गरजांच्या बाबतीत आश्वस्त राहू शकता. तसेच, यांचे आरोग्य सेवा तज्ज्ञ, अनुभवी, जाणकार, आणि कार्यक्षम आहेत. तुमच्या सोयीनुसार तुमची CBC चाचणी करून घेण्यासाठी आम्हाला आजच संपर्क करा









