Language
10 खाद्यपदार्थ जे तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवल नैसर्गिकरीत्या वाढवतात
तुम्हाला माहीत आहे का की टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स हे केवळ एक सेक्स हार्मोन म्हणून शरीरात कार्यरत नसून त्याचे इतर देखील अनेक फायदे आहेत? या हार्मोनमुळे तुम्ही शक्तिशाली आणि निरोगी राहता आणि यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील चांगली राहते.
पण जर तुम्हाला आहारातून योग्य पोषकतत्त्वे मिळत नसतील, तर तुमची टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो, मसल्स बनवण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, आणि तुमची प्रतिकारशक्ति देखील कमी होऊ शकते. तरी, तुम्ही टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी नैसर्गिकरीत्या वाढवून या परिस्थितीला टाळू शकता.
या ब्लॉग मध्ये अशा दहा पौष्टिक खाद्यपदार्थांबद्दल जाणून घ्या जे तुम्हाला फक्त निरोगी आणि शक्तिशाली बनवण्यातच नाही तर तुमच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यामध्ये देखील मदत करतील.
10 खाद्यपदार्थ जे तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवल नैसर्गिकरीत्या वाढवतील
खाली काही अशा खाद्यपदार्थांची नावे दिली आहेत जी तुम्ही नियमित खाल्लीत तर तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवल वाढू शकेल.
- अवकॅडो
- बेरीज आणि चेरीज
- हिरव्या पालेभाज्या
- आलं
- कांदा
- दुग्धजन्य पदार्थ
- समुद्री मासे
- डाळिंब
- अंडी
- ऑलिव्ह ऑईल
1. अवकॅडो
एक चमचा अवकॅडो मधून तुम्हाला भरपूर प्रमाणात बोरॉन आणि मॅग्नेशियम मिळू शकते. शाकाहारी व्यक्तींसाठी अगदी योग्य असा अवकॅडो नैसर्गिकरीत्या तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवण्यात मदत करणाऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीतील एक महत्त्वपूर्ण फळ आहे.
2. बेरीज आणि चेरीज
भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडंट्स असलेल्या बेरीज ऑक्सीडेटिव्ह ताण आणि लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या जळजळी तून तयार होणाऱ्या मुक्त मूलकांपासून सुरक्षा प्रदान करतात. बेरीज आणि चेरीज फ्लॅव्हिनॉईड एंटीऑक्सीडंट्सने भरलेल्या असतात, म्हणजेच यामुळे जळजळीतून निर्माण होणाऱ्या परिणामांपासून लेडिग पेशींचे संरक्षण करून टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यात मदत होते. त्यामुळे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेरीज खाऊ शकता किंवा त्यांचा जूस बनवून पिऊ शकता. तसेच, कृत्रिम उत्पादनांपेक्षा नैसर्गिक अन्नपदार्थांचे सेवन जास्त करा.
3. हिरव्या पालेभाज्या
पालेभाज्या जसे ब्रोकोली, केल, आणि पालक टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्यासाठी अत्यावश्यक भाज्या समजल्या जातात, आणि हे शक्य होते त्यांच्यातील भरपूर सूक्ष्म पोषाकतत्त्वांच्या उपस्थितीमुळे. या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम उपस्थित असते आणि या भाज्या मुक्त मूलकांना नियंत्रित ठेवून टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्यात मदत करतात.
4. आलं
आलं ही अशी भाजी आहे जिचे रोज आहारात सेवन केल्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढण्यात मदत होते. आलं त्यातील अद्वितीय अशा औषधी गुणधर्मांसाठी जगभरात ओळखले जाते, याचे सेवन केल्याने निरोगी शुक्राणूंच्या आकार विज्ञानासाठी अत्यावश्यक टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढण्यात मदत होते.
तुम्ही स्वयंपाकात आल्याची पेस्ट वापरू शकता किंवा चहा करताना त्यात उकळून देखील पिऊ शकता. तसेच, नेहमीच सर्वाधिक उपयुक्ततेसाठी पॅकेटमधले आले वापरण्याऐवजी ताजे आले वापरा.
5. कांदा
बऱ्याचदा कामोत्तेजक पदार्थ म्हणून समजला जाणारा कांदा नैसर्गिकरीत्या तुमचे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवण्यामध्ये मदत करतो. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट्स असतात जे इरेक्शन प्रणाली सुधारण्यामध्ये मदत करतात, तसेच कांदा एंटी-एजिंग आणि पुनरुज्जीवन गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
कांद्यामध्ये जळजळ कमी करणारे गुणधर्म आहेत, म्हणजेच हे गुणधर्म तुमच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या पताळीसाठी हानिकारक असणाऱ्या मुक्त मूलकांना वाढण्यापासून रोखतात. तुम्ही कांदा कच्चा खाऊ शकता, सॅलडमध्ये वापरू शकता, किंवा पदार्थांमध्ये शिजवूनही वापरू शकता.
6. दुग्धजन्य पदार्थ
हा एक सर्वोत्तम आहे स्त्रोत ज्यामुळे तुमचे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढण्यास मदत होते. दुग्धजन्य पदार्थ तुम्हाला अनेक महत्त्वाचे पोषक तत्त्व जसे कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व प्रदान करतात. अर्थात, जर तुम्हाला दूध पचत नसेल आणि तुम्ही वेगान असाल, तर वनस्पतींपासून मिळणारे दूध देखील तुम्हाला तुमची दैनंदिन पोषक तत्त्वांची पूर्तता करू शकते.
तसेच, दूध पोषणाचे परिपूर्ण स्त्रोत समजले जाते. रोज दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला आवश्यक असलेले दैनंदिन सूक्ष्म पोषक तत्त्व मिळतात, जी जोश आणि पुरुषत्वासाठी आवश्यक असतात.
7. समुद्री मासे
समुद्री मासे आहारातून भरपाई होत असेलेल्या अनेक सूक्ष्म पोषक तत्त्वांसाठी आवश्यक असतात. हिल्सा, पापलेट, आणि सार्डिन्स यासारख्या समुद्री मास्यांमध्ये चरबी विराघळवणारे जीवनसत्त्व (अ, ड) भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात असे समजले जाते. ज्यामुळे हे मासे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात.
तसेच, नेहमी जास्त चरबी असलेले मासेच निवडा ज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फिश ऑइल उपलब्ध असते.
8. डाळिंब
डाळिंब, आणखीन एक नैसर्गिक कामोत्तेजक फळ, जे इरेक्शन संबंधी समस्यांवर पूर्वीच्या काळापासून एक रामबाण उपाय समजले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह उपलब्ध असते, म्हणजेच यामुळे रक्ताभिसरण सुधारते, आणि अजून याचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषत्वासाठी हे फळ उत्तम समजले जाते.
दैनंदिन आयुष्यात याचे सेवन केल्यास डाळिंब हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय समजले जाते. एंटीऑक्सीडेंट्सने परिपूर्ण असलेले हे डाळिंब मुक्त मूलकांना नियंत्रित ठेवते, त्याचबरोबर डाळिंब एंटी-एजिंग, रक्तदाब कमी करणे, आणि लाल रक्तपेशींची संख्या वाढवणे अशा अनेक बाबतीत उपयुक्त सिद्ध होते.
9. अंडी
प्रोटिनचे उत्तम स्त्रोत असलेली अंडी एचडीएल, जीवनसत्त्व, आणि ओमेगा-3 फॅटी एसिड्स ने परिपूर्ण आहेत, ज्यामुळे हे नैसर्गिकरीत्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अंड्यामुळे तुमचे वजन न वाढता मसल मास निर्माण करण्यामध्ये मदत होते. तसेच, अंड्यामध्ये सेलेनियम असते, जे एक अत्यंत उत्तम एंटीऑक्सीडेन्ट आहे ज्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यात मदत होते.
10. ऑलिव्ह ऑईल
एक अत्यंत आरोग्यदायी पोषक पर्याय असलेले ऑलिव्ह ऑईल टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्समुळे ऑलिव्ह ऑईल हृदयाच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम समजले जाते. तसेच, जीवनसत्त्व ई आणि के यासारखे सूक्ष्म पोषकतत्त्व वाढण्यासाठी उच्च प्रतीचे ऑलिव्ह ऑईल सर्वात उपयुक्त समजले जाते.
निष्कर्ष
टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची कमतरता अल्पकालीन आजारपण, बैठी जीवनशैली किंवा वृद्धत्वामुळे उद्भवू शकते. तुम्ही ही तात्पुरती कमतरता दैनंदिन आहारामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढवणाऱ्या या 10 खाद्यपदार्थांचा समावेश करून भरून काढू शकता. व्यक्त करता न येणाऱ्या थकव्यासंबंधी किंवा पुरुषत्व कमी झाल्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी तुमची हार्मोन पातळी तपासण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला विनाकारण खूपच अशक्तपणा जाणवतो आहे का? तुमच्या अशा परिस्थितीसाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला टेस्टोस्टेरॉन डायग्नोस्टिक टेस्ट करण्याचे सुचवू शकतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवणारे खाद्यपदार्थ खाण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमची सध्याची टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी तपासण्यासाठी एक डायग्नोस्टिक टेस्ट देखील करून घेऊ शकता. मेट्रोपोलिस प्रयोगशाळा सर्वोत्तम डायग्नोस्टिक डील्स आणि संपूर्ण भारतात तुमच्या घरी येऊन द्रव नमुना घेण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ उपलब्ध करून देते. तुमच्या जवळच्या मेट्रोपोलिस प्रयोगशाळेत जाऊन घरी येऊन नमूना घेण्याच्या सुविधेबद्दल विचारणी करा.









