Language
2डी ईको टेस्ट: प्रकार, उपयोग, आणि 2 डी ईको ईकोकार्डिओलॉजीचे परिणाम कसे समजून घ्यायचे
Table of Contents
- 2डी ईको टेस्ट म्हणजे काय?
- मी 2 डी ईको टेस्ट करणे का गरजेचे आहे?
- 2 डी ईको टेस्ट दरम्यान काय होते?
- 2 डी ईको टेस्ट नंतर काही पथ्य पाळण्याची आवश्यकता आसते का?
- 2 डी ईको टेस्ट हार्टअटॅक आल्याचे सांगू शकते का?
- 2 डी ईको टेस्ट साठी फास्टिंग आवश्यक आहे का?
- 2 डी ईको टेस्ट चे कोणकोणते उपयोग आहेत?
- 2 डी ईको टेस्टशी कोणकोणते धोके जोडलेले आहेत आणि यादरम्यान कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात?
- 2 डी ईको टेस्ट करण्याचे कोणकोणते फायदे आहेत?
- 2 डी ईको टेस्ट करून कोणकोणत्या समस्यांचे निदान केले जाऊ शकते?
- 2 डी ईको टेस्टचे परिणाम काय दर्शवतात?
- निष्कर्ष
हृदयाची रचना आणि कार्यप्रणाली याचा अभ्यास करण्यामध्ये, हृदयासंबंधी आजारांचे निदान करण्यासाठी 2 डी ईको एक अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. या ब्लॉग मध्ये, आपण 2डी ईको टेस्ट बद्दल तुम्हाला जी माहिती हवी आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत, याच्या विस्तृत प्रकारांपासून ते कोणत्याही विपरीत स्थितीचे निदान करण्यासाठी आणि हृदयाच्या उपचारांच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याच्या उपयुक्ततेपर्यन्त. कोणतीही शारीरिक शस्त्रक्रिया न करता केली जाणारी या प्रक्रियेचे महत्त्व जाणून घ्या, वेगवेगळ्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये याची उपयुक्तता, आणि 2डी ईको टेस्टचे परिणाम समजून घेणे आणि या टेस्टसाठी येणारा खर्च सर्व काही जाणून घ्या.
2डी ईको टेस्ट म्हणजे काय?
2 डी ईको (टू-डायमेन्शन ईकोकार्डिओग्रॅाफी) टेस्ट एक अत्याधुनिक चित्रण तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये हृदयाची रचना आणि क्रिया हे सर्व एका अल्ट्रासाऊंडच्या मदतीने बघितले जाते आणि एका कम्प्युटर स्क्रीन वर तुमच्या हृदयाचे जीवंत चित्र तुम्हाला दाखवले जाते. 2 डी ईको टेस्ट द्वारे काढलेल्या फोटोंना 2 डी ईकोकार्डिओग्रॅाफी असे म्हणतात.
ही कोणतीही शारीरिक शस्त्रक्रिया न करता केली जाणारी पद्धत असल्यामुळे प्रोफेशनल्सना तुमच्या हृदयाच्या आतील भागाचा, वॉल्व्ह आणि रक्तवाहिन्यांचा अभ्यास करता येतो. याच्या विविधते आणि अचूकते मुळे, 2 डी ईको वैद्यकीय चाचणी हृदयाच्या आजारांसंबंधी कार्डिओलॉजी मध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या निदानांसाठी एक अत्यंत महत्त्वाची चाचणी ठरली आहे. 2 डी ईको टेस्टला हृदयाचे सोनोग्राम किंवा हृदयाचे अल्ट्रासाऊंड देखील म्हणले जाते.
मी 2 डी ईको टेस्ट करणे का गरजेचे आहे?
तुमच्या कार्डियाक समस्या जसे की हृदयातील वॉल्व्ह संबंधी विकार, जन्मतः असलेले अपंगत्व, हृदयाच्या कार्यातील विसंगती या सर्वाचे निदान वेळेत होण्यासाठी 2 डी ईको टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा हृदयाचे अनियमित ठोके याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर बऱ्याचदा ही टेस्ट करून घेण्याचे सुचवतात.
2 डी ईको टेस्ट दरम्यान काय होते?
2 डी ईको वैद्यकीय चाचणी दरम्यान, तुम्हाला एका निरीक्षण टेबलावर झोपवले जाते आणि तंत्रज्ञ तुमच्या छातीवर ट्रान्सड्यूसर लावतात. हे ट्रान्सड्यूसर उच्च वारंवारतेच्या ध्वनीलहरी निर्माण करतात, आणि तुमच्या हृदयाच्या हृदयावर आदळून परत येणाऱ्या आवाजाला टिपतात. हा आवाज तुमच्या एका मॉनिटर वर हृदयचा प्रत्यक्ष फोटो तयार करतात. तंत्रज्ञ तुमच्या रक्ताचा प्रवाह जाणून घेण्यासाठी डॉपलर सारख्या इतर पद्धतींचा वापर करू शकतात. तसेच, ही पद्धत वेदनारहित आहे आणि यासाठी 30-60 मिनिटांचा कालावधी लागतो.
2 डी ईको टेस्ट नंतर काही पथ्य पाळण्याची आवश्यकता आसते का?
2 डी ईको वैद्यकीय चाचणी नंतर तुम्ही दैनंदिन क्रिया करू शकता. या टेस्ट नंतर कोणत्याही विश्रांतीची आवश्यकता नाही. तुमचे हेल्थकेअर प्रोव्हायडर तुमच्यासोबत तुमचे परिणाम तपासतील, तुम्हाला त्या समजावतील आणि त्याप्रमाणे योग्य ती पाऊले उचलण्याचा सल्ला देतील.
2 डी ईको टेस्ट हार्टअटॅक आल्याचे सांगू शकते का?
2 डी ईको टेस्ट हार्टअटॅक साठीची प्राथमिक निदान चाचणी नाही. जरी यामध्ये हृदयाच्या एखाद्या स्नायूला झालेली इजा याबद्दल माहिती मिळत असली तरी हार्टअटॅक संबंधी झालेले नेमके बदल यामध्ये कळू शकत नाहीत. त्याऐवजी, हार्टअटॅकचे निदान करण्यासाठी सामान्यतः इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) आणि रक्त तपासण्या (ट्रोपोनिन पातळी) या चाचण्या केल्या जातात.
2 डी ईको टेस्ट साठी फास्टिंग आवश्यक आहे का?
सहस 2 डी ईको टेस्ट साठी फास्टिंग आवश्यक नाही, कारण यामध्ये तुमचे रक्त किंवा मूत्र याचे नमूने घेतले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही टेस्ट आधी नेहमी प्रमाणे काहीही खाऊ पिऊ शकता. तरी, जेव्हा ट्रान्सोफेजल 2 डी ईकोकार्डिओग्राम (जेव्हा ट्रान्सड्यूसर तुमच्या अन्ननलिकेमध्ये पाठवून हृदयाचे फोटो घेतले जातात), केला जातो तेव्हा कदाचित काही तास आधी तुम्हाला काही ही खाण्याची किंवा पिण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तथापि, हेल्थकेअर प्रोव्हायडर द्वारा किंवा चाचणी करणाऱ्या ठिकाणी देण्यात आलेल्या काही विशिष्ट सूचनांचे पालन करणे फायदेशीर ठरेल.
2 डी ईको टेस्ट चे कोणकोणते उपयोग आहेत?
2 डी ईको टेस्टचे उपयोग खालील प्रमाणे आहेत:
- हृदयचा रक्तप्रवाह तपासणे
- काही रक्ताच्या गुठळ्या असल्यास त्या शोधणे
- तुमच्या हृदयाच्या भिंती आणि वॉल्व्ह मधील विसंगती शोधणे
- शस्त्रक्रिया किंवा किंवा कोणतेही शारीरिक हस्तक्षेप यासारख्या कार्डियाक उपचारांच्या प्रभावाचा आढावा घेणे
- रुग्णाच्या हृदयाच्या गंभीर समस्यांचे सतत निरीक्षण करणे
2 डी ईको टेस्टशी कोणकोणते धोके जोडलेले आहेत आणि यादरम्यान कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात?
2 डी ईको वैद्यकीय चाचणी ही सामान्यतः सुरक्षित समजली जाते आणि यामध्ये कोणताही शारीरिक हस्तक्षेप केला जात नाही, ज्यामुळे यात कोणतेही धोके आणि समस्या निर्माण होत नाहीत. तरी, काही केसेस मध्ये तुम्हाला खालील अनुभव येऊ शकतात
अल्ट्रासाऊंड जेलमुळे किंचित अस्वस्थता किंवा त्वचेला खाज सुटणे
क्वचित प्रसंगी जेल पासून अॅलर्जी येणे
ट्रान्सोफेजल ईकोकार्डिओग्रॅाफी (टीईई), हा 2 डी ईकोकार्डिओग्रॅामचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुमच्या अन्ननलिकेतून एक प्रोब शरीरात पाठवला जातो. या केस मध्ये, यामुळे तुमच्या अन्ननलिकेला खाज सुटण्याची किंवा किंचित इजा होण्याची शक्यता असते.
टेस्टच्या आधी हेल्थकेअर प्रोव्हायडरला तुम्ही तुमच्या जुन्या आजारांबद्दल किंवा काळजी घेण्यासारख्या गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. अचूक निदान आणि महत्त्वपूर्ण कार्डियाक मुद्दे, यासंबंधी 2 डी ईको टेस्टचे फायदे यातील प्रक्रियेसंबंधी क्वचित प्रसंगी निर्माण होणाऱ्या धोक्यांपेक्षा अनेक पटीने जास्त आहेत, आणि गंभीर समस्या तर अगदीच दुर्मिळ असतात.
2 डी ईको टेस्ट करण्याचे कोणकोणते फायदे आहेत?
2 डी ईको टेस्टचे असंख्य फायदे आहेत:
कोणताही शारीरिक हस्तक्षेप नाही: ही एक शारीरिक हस्तक्षेप नसलेली पद्धत आहे, 2 डी ईको टेस्ट मध्ये जो शस्त्रक्रिया करावी लागत नाही.
गरोदरपणातील निरीक्षणे: गरोदर महिलांसाठी, त्यांच्या गरोदरपणात हृदयाचे आरोग्य तपास 2 डी ईको टेस्ट एक महत्त्वाची भूमिका बजावते.
शस्त्रक्रियेआधी धोक्याची पातळी तपासणे: हृदयाच्या कोणत्याही शस्त्रक्रियेआधी, एक 2 डी ईको टेस्ट केल्याने पुढील धोके ओळखणे आणि रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया योग्य आहे का नाही हे तपासले जाऊ शकते.
लहान मुलांमधील कार्डिओलॉजी संबंधी उपयोग: लहान मुलांमधील कार्डिओलॉजी मध्ये, जन्मतः असलेल्या हृदयासंबंधी समस्या ओळखण्यासाठी आणि मुलांच्या हृदयाच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी 2 डी ईको टेस्टचे महत्त्व असामान्य आहे.
स्ट्रेस टेस्ट: स्ट्रेस ईकोकार्डिओग्राम करण्याआधी शारीरिक ताण निर्माण केला जातो त्याआधी आणि नंतर 2 डी ईको केली जाते. यामुळे दगदग झाल्यामुळे हृदयाच्या कार्यातील होणारे बदल आणि त्यामुळेच निर्माण होणाऱ्या समस्या याचे निरीक्षण करणे सोपे जाते.
परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध: इतर ईमेजिंग स्टडीजच्या तुलनेत, 2 डी ईको टेस्टची किंमत अगदीच वाजवी म्हणजे 1000 - 4000 इतकीच आहे.
2 डी ईको टेस्ट करून कोणकोणत्या समस्यांचे निदान केले जाऊ शकते?
2 डी ईकोकार्डिओग्रामचा उपयोग अनेक कार्डियाक समस्यांचे निदान करण्यासाठी केला जाऊ शकतो. ही टेस्ट अनेक हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी विसंगती ओळखण्यामध्ये आणि त्याची लक्षणे दाखवून देण्यामध्ये मदत करते.
हृदय काम न करणे,
धमनीविकार
महाधमनी (तुमच्या शरीरातील सर्वात मोठी धमनी) मधील असामान्यता
हृदयातील गाठी,
हृदयाचे अनियमित ठोके
हृदयाच्या वॉल्व्हच्या स्नायूंमधील संसर्ग
रिगर्जिटेशन किंवा स्टेनोसिस, वेंटीक्यूलर सेप्टल डिफेक्ट यासारख्या वॉल्व्ह (हृदयाचे वॉल्व्ह संबंधी), संबंधी विसंगती, आणि
कार्डिओमायोपॅथी यासारख्या तुमच्या हृदयाच्या प्रवाह क्षमतेवर परिणाम करणाऱ्या परिस्थिती 2 डी ईकोकार्डिओग्रामच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात.
त्याचबरोबर, 2 डी ईकोकार्डिओग्रामचा तुमच्या शरीरातील सतत वाढणारा हृदयावरणाचा दाह यासारखे पेरिकार्डियल आजार (तुमच्या हृदयाच्या बाहेरील स्तरासंबंधी आजार - पेरिकार्डियम) ओळखण्यासाठी देखील वापर केला जातो.
2 डी ईको टेस्टचे परिणाम काय दर्शवतात?
2 डी ईको वैद्यकीय चाचणीचे खालील परिणाम दर्शवतात:
हृदयाची रचना: या टेस्ट मध्ये हृदयाच्या रचनेचा अभ्यास केला जातो, आणि त्याच्या आकाराबद्दल माहिती दिली जाते. सामान्य आकारापेक्षा वेगळा आकार असणे अनेक कार्डियाक समस्या असल्याचे सूचक असू शकते.
वॉल्व्हचे कार्य: टेस्ट मध्ये हृदयाच्या वॉल्व्हच्या कार्याचे निरीक्षण केले जाते, ते लीक होत नाहीत ना किंवा खूप आकस लेल्या नाहीत ना याचा अभ्यास केला जातो. हृदयाच्या वॉल्व्हसंबंधी आजार ओळखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते.
हृदयाच्या भिंतीची हालचाल: तुमच्या हृदयाच्या भिंतींच्या हालचालीचे निरीक्षण केल्याने, या टेस्ट मुळे काही ठराविक भागातील भिंतींच्या हालचालीतील विसंगती लक्षात येतात, या विसंगती हृदय विकाराच्या झटक्यामुळे तुमच्या हृदयाच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे हे सूचित करतात.
प्रवाहाचे प्रमाण: 2 डी ईको फोटो द्वारे हृदयाच्या रक्त प्रवाहित करण्याची क्षमता मोजली जाते. यामुळे हृदयाचे संपूर्ण कार्य तपासण्यामध्ये मदत होते, आणि ही प्रवाह करण्याची क्षमता कमी झाली असल्यास हृदय निकामी होण्याची संभावना दर्शवते.
रक्त प्रवाह: डॉप्लर अल्ट्रासाऊंड, हृदयाच्या 2 डी ईको मध्ये समाविष्ट असतो, तुमच्या शरीरातील रक्त प्रवाहाच्या पद्धतीचे निरीक्षण केले जाते. यातील विसंगती जन्मतः हृदय निकामी असणे किंवा वॉल्व्हसंबंधी असामान्यता दर्शवतात.
पेरिकार्डियल एफ्यूजन: हृदयाच्या आजूबाजूला साठलेले अतिरिक्त द्रव्य या टेस्ट मुळे ओळखले जाऊ शकते, या द्रव्याला पेरिकार्डियल एफ्यूजन असे म्हणतात. दाह निर्माण झाल्याचा परिणाम म्हणून हे द्रव्य शरीरात वाढते.
कार्डिओलॉजिस्ट अचूक निदान करून तुमच्यासाठी योग्य ती उपचार पद्धती ठरवण्यासाठी 2 डी ईकोकार्डिओग्राम द्वारा मिळालेल्या माहितीचा अभ्यास करतात.
निष्कर्ष
2 डी ईको टेस्ट ही एक अत्यंत प्रभावी निदान पद्धती आहे, जी कोणत्याही शारीरिक हस्तक्षेपाशिवाय केली जाते आणि यामध्ये तुमच्या हृदयाच्या संपूर्ण आरोग्याचे निरीक्षण केले जाते. रचनेमधील विसंगती पासून ते वॉल्व्हचे कार्य आणि उपचार प्रगतीच्या अभ्यासापर्यन्त, याची उपयुक्तता वैविध्यपूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हृदयाच्या अनेक आजारांचे निदान आणि त्या आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे यामध्ये या टेस्टचे महत्त्वाचे योगदान आहे. 2 डी ईको टेस्ट सोबतच, तुम्हाला जर तुमच्या हृदयाच्या आरोग्याची एका विस्तृत रक्त चाचणी द्वारे खात्री करून घ्यायची असेल तर कोणताही विचार न करता मेट्रोपोलिस लॅब्सला या. आमची ट्रोपोनिन I आणि ट्रोपोनिन T टेस्ट तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची अगदी अचूक माहिती देतील. आजच तुमची टेस्ट बुक करा.









