Do you have any queries?

or Call us now at 9982-782-555

back-arrow-image Search Health Packages, Tests & More

Language

ऑस्टियोआर्थरायटिस: कारणे, लक्षणे आणि उपचारांचे पर्याय

Last Updated On: Aug 19 2025

Table of Contents


ऑस्टियोआर्थरायटिस मुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेसोबत आणि मर्यादांसोबत जगणे एक कठोर आवाहन वाटू शकते. तुम्ही जर ऑस्टियोआर्थरायटिसमुळे होणाऱ्या वेदनांसाठी प्रभावी उपाय शोधत असाल, तर याची कारणे समजून, दिसणारी लक्षणे ओळखणे, आणि उपलब्ध उपचारांचे पर्याय जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

या ब्लॉग मध्ये तुम्हाला ऑस्टियोआर्थरायटिस संबंधी मार्गदर्शन मिळेल, तसेच तुमच्या या अवस्थेपासून सुटका मिळवण्यासाठी स्पष्ट आणि व्यवहारिक उपाय देखील मिळेल. हा सामान्य ऑस्टियोआर्थरायटिसचा प्रकार कसा विकसित होतो, लक्षणांचे निरीक्षण, आणि पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही उपचार धोरणांबद्दल चर्चा केली जाईल.

तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी, या विषयाबद्दल माहिती मिळवणे, एका आरामदायक आणि क्रियाशील जीवनशैली मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल ठरू शकते.

ऑस्टियोआर्थरायटिस म्हणजे काय?

ऑस्टियोआर्थरायटिस या आजाराला OA अशा नावाने देखील संबोधले जाते. हा एक सांधेदुखीचा सर्वसामान्य प्रकार आहे ज्याचा जगभरातील असंख्य लोकांवर परिणाम होत आहे. तुमच्या हाडांंच्या टोकांवरचे मऊ आवरण म्हणजे कार्टिलेज जेव्हा कालांतराने झिजते तेव्हा हा त्रास उद्भवू शकतो. जरी ऑस्टियोआर्थरायटिस मुळे कोणत्याही सांध्याला नुकसान पोहचू शकते, तरी विशेषतः हात, गुडघे, हिप्स, आणि मणका या सांध्यांंना सामान्यतः जास्त नुकसान होऊ शकते. तुम्हाला वेदना, ताठरपणा, आणि प्रसंगी सूज देखील जाणवते. यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करणे देखील त्रासदायक वाटेल, पण तुमच्या आयुष्यावरील याचा परिणाम कमी करण्यासाठी OA समजून घेणे हे महत्त्वाचे पाऊल ठरते.

ऑस्टियोआर्थरायटिसचे कोणकोणते प्रकार आहेत?

ऑस्टियोआर्थरायटिसचे अनेक प्रकार आहेत, प्रत्येकाचा वेगवेगळ्या सांध्यांवर परिणाम होतो आणि प्रत्येक प्रकाराची वेगवेगळी आवाहने आहेत.

  • प्राथमिक ऑस्टियोआर्थरायटिस: या प्रकाराला झीज झाल्यामुळे होणारी सांधेदुखी असे देखील म्हणले जाते. ही सामान्यतः जसे जसे तुमचे वय वाढत जाते आणि सांध्यांतील कार्टिलेज झीजते तेव्हा उद्भवतो.
  • माध्यमिक ऑस्टियोआर्थरायटिस: एखाद्या आजाराचा किंवा स्थितीचा म्हणजेच लठ्ठपणा, वारंवार झालेले आघात किंवा शस्त्रक्रिया, किंवा सांध्यांवर परिणाम करणाऱ्या जन्मापासून असलेल्या काही विसंगती या स्थितींचा परिणाम म्हणून या प्रकारची सांधेदुखी उद्भवते.

ऑस्टियोआर्थरायटिसची कोणकोणती लक्षणे आहेत?

ऑस्टियोआर्थरायटिसची लक्षणे ओळखता आली तर या आजारापासून लवकर आणि जास्त प्रभावीपणे सुटका मिळेल. ऑस्टियोआर्थरायटिसची लक्षणे सामान्यतः हळू हळू विकसित होतात आणि जसे जसे वय वाढत जाते, ही लक्षणे आणखीनच त्रासदायक होत जातात. खाली काही महत्त्वाची लक्षणे देत आहोत ज्यांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे:

  • वेदना: प्रभावित सांध्यांमध्ये हालचाल करण्याआधी किंवा नंतर वेदना होतात.
  • ताठरपणा: सांध्यांतील ताठरपणा सर्वात जास्त सकाळी उठताना किंवा खूप वेळ बसून उठल्यावर जाणवतो.
  • अस्वस्थता: तुम्ही जेव्हा तुमच्या प्रभावित सांध्यांवर अलगद ताण देता तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते, वेदना होऊ शकतात.
  • लवचिकता कमी होणे: तुम्हाला कदाचित तुमचे सांधे त्यांच्या पूर्ण क्षमतेने हालवता येणार नाहीत.
  • घर्षण जाणवणे: तुम्ही जेव्हा हालचाल कराल तेव्हा सांध्यांमध्ये तुम्हाला घर्षण जाणवू शकते आणि तुम्हाला हाड मोडण्याचे काही आवाज येऊ शकतात.
  • सूज येणे: सांध्यांच्या आजूबाजूला असलेला मऊ स्नायू वाढल्याने हा त्रास उद्भवू शकतो.

ऑस्टियोआर्थरायटिसची कारणे कोणकोणती आहेत?

ऑस्टियोआर्थरायटिसची नेमकी लक्षणे अद्याप समजलेली नाहीत, तरी सांध्यांची झीज होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. जसे की:

  • कार्टिलेज निकामी होणे: तुमच्या हाडांच्या टोकांवरील मऊ आवरण म्हणजेच कार्टिलेज हाडांमध्ये घर्षण न होऊ देता सहज हालचाल होण्यास मदत करते, पण कालांतराने, हे कार्टिलेज झीजते आणि तुमच्या हाडांची सुरक्षा करण्यास विफल ठरते.
  • सांध्यांची रचना बदलणे किंवा अतीवापर: खूप जास्त वापर झाल्यामुळे किंवा कष्ट केल्यामुळे किंवा दुखापतींमुळे ऑस्टियोआर्थरायटिस उद्भवू शकतो.

ऑस्टियोआर्थरायटिस संबंधी कोणकोणते धोके असू शकतात?

ऑस्टियोआर्थरायटिस उद्भवण्याचा धोका अनेक घटकांमुळे वाढू शकतो. हे जाणून घेतल्याने तुम्ही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना करू शकता:

  • वय: हा धोका वाढत्या वयाबरोबर वाढत जातो.
  • लिंग: महिलांमध्ये विशेषतः रजोनिवृत्ती नंतर महिलांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिस होण्याची शक्यता बळावते.
  • लठ्ठपणा: तुमचे वजन वाढलेले असेल तर वजन पेलवणाऱ्या सांध्यांवर म्हणजेच हिप्स आणि गुडघे यांच्यावर जास्तीचा भार येतो.
  • सांध्यांना झालेली दुखापत: कोणताही खेळ खेळताना किंवा अपघातामुळे झालेली दुखापत ऑस्टियोआर्थरायटिस होण्याची शक्यता वाढवते.
  • अनुवांशिक: काही व्यक्तींमध्ये अनुवांशिकच ऑस्टियोआर्थरायटिस होण्याची शक्यता असते.

ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान कशाप्रकारे केले जाते?

ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान करण्यासाठी काही पद्धती एकत्रितपणे वापरल्या जातात:

  • क्लिनिक मधील तपासणी: तुमचे डॉक्टर तुमच्या सांध्यांमध्ये वेदना किती प्रमाणात होत आहेत, सूज किती आहे, लालसरपणा, आणि सांधे किती लवचिक आहेत हे तपासतील.
  • रुग्णाची पूर्व माहिती: तुमच्या सांध्यांवर परिणाम होईल अशा प्रकारच्या पूर्वी तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही लक्षणांबाबत आणि पूर्वी झालेली संभाव्य दुखापत याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करा.
  • इमेजिंग टेस्ट: एक्स-रे किंवा एमआरआय स्कॅन्स केल्याने कार्टिलेजची झालेली झीज, हाडाचे झालेले नुकसान, आणि सांध्यांमधील इतर झालेले बदल तपासता येऊ शकतात.
  • लॅब टेस्ट्स: ऑस्टियोआर्थरायटिससाठी कोणतीही रक्त तपासणी करावी लागत नाही, तरी काही चाचण्या केल्याने संधिवात यासारखी सांधेदुखीची इतर कारणे समोर येऊ शकतात.

ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान करण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट्स केल्या जातात?

जर तुमचे सांधे दुखत आहेत किंवा तुम्हाला सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवत असेल तर, डॉक्टर तुम्हाला ऑस्टियोआर्थरायटिस झाल्याची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करण्याचे सुचवू शकतात. या चाचण्यांमुळे इतर समस्या समोर येऊ शकतात आणि सांध्यांच्या झालेल्या नुकसानाची तीव्रता देखील लक्षात येते.

  • शारीरिक तपासणी: तुमचे डॉक्टर सूज, वेदना, कितपत हालचाल होऊ शकते आहे, आणि एखाद्या विसंगतीची लक्षणे तपासण्यासाठी तुमच्या प्रभावित सांध्यांचे निरीक्षण करतील.
  • एक्स-रेज: यामध्ये कार्टिलेजची झीज, हाडांची अतिरिक्त वाढ, आणि सांध्यांमधील उपलब्ध जागा कमी होणे, या सर्व ऑस्टियोआर्थरायटिसचे सूचक असणाऱ्या लक्षणांचे निरीक्षण केले जाते.
  • एमआरआय स्कॅन्स: गरज पडल्यास, एक एमआरआय केल्याने कार्टिलेज, लीगामेंट्स, आणि आजूबाजूचे मऊ स्नायू यांचे बारकाईने निरीक्षण करण्यामध्ये मदत होते.
  • सांध्यांमधील द्रव्य पदार्थाचे निरीक्षण: संसर्ग किंवा वात यासारखा इतर कोणत्या प्रकारचा संधिवात आहे का हे तपासण्यासाठी सांध्यांमधील द्रव्य पदार्थाचा नमूना घेतला जाऊ शकतो.
  • रक्त तपासणी: ऑस्टियोआर्थरायटिससाठी कोणतीही रक्त तपासणी केली  जात नाही, तरी संधिवात यासारख्या इतर वेदनादायी सांधेदुखीच्या प्रकारांचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाऊ शकते.

ऑस्टियोआर्थरायटिस वर कशाप्रकारे उपचार केला जातो?

ऑस्टियोआर्थरायटिस पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, तरी ऑस्टियोआर्थरायटिससाठी वेगवेगळे उपचाराचे पर्याय आहेत ज्यामुळे वेदना कमी हे जाऊ शकतात, सांध्यांचे कार्य सुधारले जाऊ शकते, आणि आजार वाढण्याच वेग कमी केला जाऊ शकतो.

तुमच्या उपचारांच्या प्लॅन मध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • औषधे: पॅरासिटामॉल, एनएसएआयडीज (स्टिरॉइड मुक्त जळजळ रोखणारी औषधे), आणि काही प्रचलित क्रीम्स ऑस्टियोआर्थरायटिस मुळे जाणवणारी अस्वस्थता कमी करण्यामध्ये मदत करू शकतात.
  • शारीरिक व्यायाम: मजबूती वाढवणारे व्यायामाचे प्रकार केल्याने हालचाल सुधारण्यामध्ये मदत होते आणि प्रभावित सांध्यांना आधार मिळू शकतो.
  • जीवनशैलीतील बदल: वजनावर नियंत्रण ठेवल्याने आणि सतत क्रियाशील राहिल्याने सांध्यांवर येणारा ताण कमी होण्यात मदत होऊ शकते.
  • सहाय्यक उपकरणे: ब्रेसेस, काठी, किंवा ऑर्थोटिक शू इन्सर्ट्स सांध्यांंना आधार देण्यामध्ये मदत करू शकतात आणि ताण हलका करू शकतात.
  • शस्त्रक्रिेयेचा पर्याय: काही गंभीर प्रकरणांमध्ये, ऑस्टियोआर्थरायटिसच्या दीर्घकालिक उपचारांसाठी सांधे बदलण्याची (जसे की गुडघा किंवा हिप बदलण्याची) शस्त्रक्रिया सुचवली जाऊ शकते.

ऑस्टियोआर्थरायटिस होणे टाळण्यासाठी काय करू शकतो?

वय आणि अनुवांशिकता ही कारणे तर बदलू शकत नाही, पण तुमच्या शरीरात ऑस्टियोआर्थरायटिस विकसित होण्याचा धोका कमी करण्यासाठी इतर अनेक धोरणे मदत करू शकतात.

  • वजनावर नियंत्रण ठेवा: वजन जास्त असले की वजन पेलवणाऱ्या सांध्यांवर जास्तीचा भार येतो, ज्यामुळे झीज लवकर होते.
  • सतत क्रियाशील रहा: पोहणे किंवा चलायला जाणे यासारख्या कमी दमवणाऱ्या क्रिया सतत करत रहा, ज्यामुळे सांधे लवचिक राहतील.
  • बसण्याची पद्धत योग्य ठेवा: तुमच्या सांध्यावर ताण येणार नाही अशा पद्धतीने बसा, उभे रहा किंवा चाला.
  • तुमचे सांधे जपा: सांध्यांना दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी व्यायाम करताना किंवा जड वस्तु उचलताना योग्य काळजी घ्या.
  • संतुलित आहार घ्या: ओमेगा-3 फॅटी एसिड्स, व्हिटॅमिन डी, आणि कॅल्शियम हाडे आणि कार्टिलेज मजबूत करण्यामध्ये मदत करतात पर्यायाने ऑस्टियोआर्थरायटिस रोखण्यात मदत होते.

जर मला ऑस्टियोआर्थरायटिस आजार असेल त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल?

जर तुम्हाला ऑस्टियोआर्थरायटिस आजार झाला असेल, तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या दैनंदिन आयुष्यावर याचा काय परिणाम होईल? या स्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते, पण योग्य धोरणे अमलात आणल्यास तुम्हाला सतत क्रियाशील आणि स्वावलंबी राहण्यात मदत होईल.

  • वेदना आणि ताठरपणा: लक्षणांची तीव्रता कमी जास्त असू शकते पण जीवनशैलीतील बदल करून, औषधे, आणि व्यायाम या सगळ्यामुळे परिस्थिती सुधारू शकते.
  • हालचाल करणे अवघड वाटणे: काही क्रिया अवघड वाटू शकतात, पण ब्रेसेस किंवा ऑस्टियोआर्थरायटिससाठी उपयुक्त असलेले गुडघ्याचे व्यायाम यांच्या मदतीने ताकद आणि लवचिकता सुधारू शकते.
  • अचानक वेदना वाढणे: हवामानातील बदल, दगदग, किंवा ताण यासारखे घटक काही काळासाठी लक्षणे आणखीन वाढतात. हा त्रास का वाढतो हे ओळखले की अचानक वेदना वाढण्याचा त्रास कमी करता येऊ शकतात.
  • दूरदृष्टी: ऑस्टियोआर्थरायटिस हळू हळू वाढतो, पण वेळेत लक्ष घातले आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे हा आजार वाढण्याच वेग कमी होतो आणि तुम्ही एक चांगले आयुष्य व्यतीत करू लागता.

ऑस्टियोआर्थरायटिस सोबत जगणं सोपं करण्यासाठी आपण काय करू शकतो?

ऑस्टियोआर्थरायटिस मुळे तुमच्या हालचालीवर आणि दैनंदिन क्रियांवर परिणाम होऊ शकतो, पण योग्य दृष्टिकोण असेल तर तुम्ही लक्षणे कमी करून तुमचे आयुष्य चांगले बनवू शकता. जीवनशैलीतील साधे सोपे बदल मोठ-मोठे फायदे देऊ शकतात.

  • सतत क्रियाशील रहा: हळू हळू करण्याच्या हालचाली जसे चालणे, पोहणे, आणि योग यामुळे तुमची लवचिकता टिकून राहते आणि सांध्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
  • वजन नियंत्रित ठेवा: जास्त वजनामुळे सांध्यांवर, विशेषतः गुडघे आणि हिप्सवर ताण येतो.
  • सहाय्यक उपकरणे वापरा: ब्रेसेस, काठी, आणि ऑर्थोटिक शूज सांध्यांंना जास्तीचा आराम देऊ शकतात.
  • गार आणि गरम शेक देण्याची थेरेपी वापरुन बघा: गरम शेक दिल्याने ताठरपणा मोकळा व्हायला मदत होते आणि गार शेक दिल्याने सूज कमी होण्यात मदत होते.
  • ताकद वाढवणारे व्यायाम करा: ऑस्टियोआर्थरायटिससाठी उपयुक्त गुडघ्याचे व्यायाम केल्याने गुडघ्याला आराम मिळतो आणि हालचाल सुधारते.
  • तुमची दिनचर्या बदला: मानवासाठी आरामदायक उपकरणे, फर्निचर आणि सांध्यांसाठी हितकारक साधने वापरुन तुम्ही सांध्यांंवर येणारा ताण कमी करू शकता.

या आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

वेळेत वैद्यकीय उपचार घेतल्याने ऑस्टियोआर्थरायटिसच्या वाढीचा वेग कमी करता येऊ शकतो आणि लक्षणे देखील कमी करता येऊ शकतात.

खालील अनुभव आल्यास डॉक्टरांना भेटा:

  • सतत सांधे दुखणे: विश्रांती घेतल्याने किंवा औषधांच्या दुकानातून दुकानदाराच्या सल्ल्याने घेतलेल्या औषधांंने बऱ्या न होणाऱ्या वेदना.
  • सूज किंवअ ताठरपणा: जर सूज आणि हालचाल करण्यामध्ये अडचण येणे हे वारंवार होत असेल, तर एक डॉक्टरच तुम्हाला योग्य उपचार शोधण्यामध्ये मदत करू शकतील.
  • चालताना किंवअ दैनंदिन कामं करताना अडचणी येणे: मर्यादित हालचाली ऑस्टियोआर्थरायटिसचा त्रास वाढत असल्याचे सूचक असू शकतात.
  • ऑस्टियोआर्थरायटिसच्या वेदनांपासून आराम न मिळणे: घरगुती उपचार आणि जीवनशैलीतील बदल यामुळे देखील काही आराम मिळाला नाही, तर वैद्यकीय उपचार घेणे फायद्याचे ठरेल.

ऑस्टियोआर्थरायटिस साधारणपणे कोणत्या वयात होऊ शकतो?

ऑस्टियोआर्थरायटिस साधारण वयाच्या 50व्या वर्षानंतर होतो, कारण जसे जसे वय वाढत जाते तशी तशी सांध्यांमधील झीज देखील वाढत जाते. तथापि, ज्यांना सांध्यांची दुखापत, लठ्ठपणा, किंवा अनुवांशिक सांधेदुखी असा त्रास असेल, विशेषतः अशा व्यक्तींना हा आजार लवकर देखील होऊ शकतो. जर काही व्यक्ती तोचतोचपणा असलेली किंवा थकवा येईल अशी कामं करत असतील तर विशेषतः अशा व्यक्तींना त्यांच्या वयाच्या 40व्या किंवा 30व्या वर्षीच या आजाराची लक्षणे दिसायला लागू शकतात.

निष्कर्ष

ऑस्टियोआर्थरायटिस  तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतो, पण योग्य माहिती आणि धोरणांचे व्यवस्थापन असेल, तर तुम्ही हालचाल कायम ठेवू शकता आणि तुमचा त्रास कमी करू शकता. जीवनशैलीतील बदल यापासून ते वैद्यकीय उपचारांपर्यन्त, ऑस्टियोआर्थरायटिसच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आणि तुमच्या सांध्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक मार्ग आहेत. वेळेत निदान आणि योग्य काळजी यामुळे या आजाराची लक्षणे कमी होण्यामध्ये लक्षणीय फरक जाणवू शकतो.

जर तुम्हाला ऑस्टियोआर्थरायटिसची लक्षणे जाणवत असतील किंवअ तुम्हाला तुमच्या सांध्यांची काळजी वाटत असेल, तर मेट्रोपोलिस हेल्थकेअर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विस्तृत निदान सेवा प्रदान करते. घरी येऊन नमूना घेण्याची सुविधा आणि आधुनिक प्रयोगशाळा यामुळे, ऑस्टियोआर्थरायटिसचा सामना करण्यामध्ये आणि तुमचे निरोगी आयुष्य सर्वतोपरी ठेवण्यामध्ये मेट्रोपोलिस हेल्थकेअर तुमचा विश्वसनीय जोडीदार आहे.

Talk to our health advisor

Book Now

LEAVE A REPLY

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular Tests

Choose from our frequently booked blood tests

TruHealth Packages

View More

Choose from our wide range of TruHealth Package and Health Checkups

View More
Cart items will be truncated if you change the city.
Do you want to proceed ?