Language
सब्जाचे बी: आरोग्य वाढवणारे आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणारे आणि पचनसंस्था सुधारणारे एक प्रकृतीचा देणगी
Table of Contents
अपचन सुधारण्यासाठी जर तुम्ही एखादा नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर सब्जाचे बी त्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे! या विस्तृत गाईड मध्ये, तुम्हाला सब्जा बियांमधील असंख्य आरोग्यदायी फायदे वाचायला मिळतील. या बिया कशा पद्धतीने वापरायच्या यावर आपण इथे चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला या बियांचा पुरेपूर फायदा मिळवता येईल. आपण या गाईड मध्ये सब्जा बियांमुळे होणाऱ्या काही दुष्परिणामांबद्दल देखील चर्चा करणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
सब्जाचे बी म्हणजे काय?
सब्जाचे बी, ज्याला बेझिल सीड्स किंवा तुकमारिया देखील म्हणतात, म्हणजे छोट्या-छोट्या बिया ज्या मधुर बेझिलच्या रोपापासून मिळतात. पाण्यात भिजवल्यावर, या बिया फुगतात आणि त्यावर एक गुळगुळीत आवरण तयार होते. सर्व आवश्यक पोषक तत्त्वे जसे की फायबर, प्रोटीन, आणि अॅंटीऑक्सीडंट्स, आपल्याला असंख्य आरोग्यदायी फायदे प्रदान करतात.
सब्जा बियांमध्ये कोणकोणती पोषण मूल्ये असतात?
सब्जा बियांमधील पोषण मूल्ये त्यांच्या मूळ प्रकारांप्रमाणे बदलू शकतात. भारतामध्ये मिळणाऱ्या सब्जा बियांमधील प्रति 100 ग्रॅम प्रमाणे पोषण मूल्ये खालील प्रमाणे आहेत:
|
पोषक घटक |
मात्रा |
|
प्रोटीन |
14.8ग्रॅम |
|
लिपीड |
13.8 ग्रॅम |
|
कार्बोहायड्रेट्स |
63.8 ग्रॅम |
|
फायबर |
22.6 ग्रॅम |
|
लोह |
2.27 मिलीग्रॅम |
|
मॅग्नेशियम |
31.55 मिलीग्रॅम |
|
झिंक |
1.58 मिलीग्रॅम |
|
कॅलरीज |
442 |
सब्जा बियांपासून मिळणारे 10 आरोग्यदायी फायदे
तुमच्या संतुलित आहारात सब्जा बियांचा समावेश केल्याने तुमच्या आरोग्याला त्याचा कमालीचा फायदा होतो. खाली सब्जा बियांचे काही महत्त्वाचे फायदे देत आहोत:
पचन क्रिया सुधारते
सब्जा बियांमधील अधिक फायबर पचन क्रिया सुधारते, ब्लोटिंग कमी करते, आणि स्वस्थ पचन संस्था प्रदान करते. त्यामुळे, सब्जा बिया खाल्ल्याने तुमचे पचन नीट होते.
वजन नियंत्रण
वजन कमी करण्यासाठी सब्जाचे बी हा एक उत्तम पर्याय आहे कारण यामध्ये उच्च प्रमाणात फायबर असते ज्यामुळे याचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीचे प्रमाण एकूणच कमी होते. तसेच, याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते, आणि खूप भूक लागून आवश्यकते पेक्षा जास्त खाणे टळते.
हायड्रेशन
सब्जा बियांमुळे हायड्रेशन सुधारते कारण या बिया अतिरिक्त पाणी शोषून घेतात आणि त्यांच्या भोवती एक गुळगुळीत आवरण तयार होते ज्यामुळे तुमच्या शरीरातील आर्द्रता टिकून राहते, ज्यामुळे तुमचे शरीर दीर्घकाळासाठी हायड्रेटेड राहते. सब्जा बी असलेले खाद्यपदार्थ किंवा पेये उन्हाळ्यामध्ये किंवा व्यायाम केल्यानंतर जेव्हा शरीरातील आर्द्रता टिकवण्याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा अत्यंत फायदेशीर ठरतात.
शरीराला थंडावा देणारा एक नैसर्गिक पदार्थ
सब्जाचे बी हा एक अत्यंत थंडावा देणार पदार्थ आहे जो तुमच्या शरीरातील उष्णता कमी करून तुम्हाला उन्हाळ्यात किंवा ताप आलेला असताना आराम देतो. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला थंडावा मिळतो, ज्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित राहून आराम मिळतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते
सब्जा बियांमुळे तुमच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्स शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामध्ये फायबर उच्च प्रमाणात आढळते जे रक्तप्रवाहातील ग्लुकोज विसर्गाची गती कमी करते पर्यायी रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढणे टळते.
डायबेटीज किंवा मधुमेह नियंत्रणासाठी उत्तम उपाय
तुमच्या आहारात सब्जा बियांचा समावेश केल्याने, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते आणि ज्यामुळे डायबेटीज संबंधी समस्या उद्भवण्याच्या शक्यता कमी होतात. तसेच, सब्जा बियांमध्ये नैसर्गिक घटक असतात जे इन्सुलिन शोषले जाण्याचे प्रमाण सुधारते. या बियांमुळे पेशी, ग्लुकोजचा एक उत्तम ऊर्जा स्त्रोत म्हणून जास्त चांगल्या प्रकारे वापर करतात पर्यायाने आपोआपच डायबेटीज होण्याची शक्यता कमी होते.
बद्धकोष्ठता किंवा कॉंस्टिपेशन आणि ऍसिडिटी पासून आराम
सब्जा बियांच्या सेवनाने पचन क्रिया सुधारल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा कॉंस्टिपेशन आणि ऍसिडिटी पासून आराम मिळतो. पाण्यात भिजवल्याने या बियांच्या भोवती एक गुळगुळीत आवरण तयार होते ज्यामुळे आतड्या त्यांचे काम सुरळीतपणे पार पडतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच, या बिया तुमच्या पचन संस्थेला थंडावा देतात ज्यामुळे ऍसिडिटी कमी होते आणि छातीतील जळजळ आणि अपचन यापासून आराम मिळतो.
त्वचेसाठी उत्तम
तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी सब्जा बियांचे अनेक फायदे आहेत. अॅंटीऑक्सीडंट्सने भरलेल्या या बिया, तुमच्या त्वचेला वेळेआधीच वृद्धत्व आणि त्वचा निस्तेज होणे याप्रकारचे नुकसान पोहचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात. तसेच, सब्जा बियांमध्ये आवश्यक पोषण तत्त्वे जसे की व्हिटॅमिन ई, ज्यामुळे त्वचा लवचिक आणि हायड्रेटेड राहते, आणि तजेलदार आणि नितळ होते. तुमच्या आहारात सब्जा बियांचा समावेश केल्याने तुमची त्वचा आतून शुद्ध होते, त्वचेची जळजळ कमी होते आणि रंग उजळतो.
श्वसन प्रणालीचे आरोग्य जपले जाते
सब्जा बियांमधील जळजळ कमी करणारे गुण दमा आणि ब्रॉंकायटिस यासारखे श्वासनासंबंधी समस्यांची लक्षणे कमी करण्यामध्ये मदत करतात, श्वसन मार्गातील जळजळ आणि श्वास घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करतात. तसेच, या बियांमध्ये असे घटक असतात जे छातीतील कफ आणि नाक चोंदणे यासारख्या अडचणी दूर करून श्वसन सुरळीत होण्यात मदत करतात.
मानसिक आरोग्य चांगले ठेवतात
सब्जा बिया तुमच्या मेंदूला चांगले काम करण्यासाठी आवश्यक पोषक घटक देतात ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. ओमेगा-3 फॅटी एसिड्स भरपूर प्रमाणात असलेल्या सब्जा बिया, विपरीत मनस्थितिशी संबंधित समस्या जसे की नैराश्य आणि अस्वस्थता, यापासून तुमच्या मेंदूला होत असलेला त्रास कमी करण्यामध्ये मदत करतात. तसेच, सब्जा बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक यासारखी पोषण तत्त्वे उपलब्ध आहेत जी न्यूरोट्रान्समीटरच्या कार्य प्रणाली मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मनःशांती देऊन ताण कमी करतात.
सब्जा बियांचा आहारात कोणकोणत्या प्रकारे समावेश केला जाऊ शकतो?
सब्जा बियांचे फायदे अनुभवण्यासाठी, 1 चमचा सब्जा बिया फुगून त्यांच्या भोवती एक गुळगुळीत आवरण तयार होईपर्यंत म्हणजेच साधारण 15-20 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा. नंतर तुम्ही या भिजवलेल्या बियाकोणत्याही खाद्यपदार्थामध्ये किंवा पेयामध्ये घालून याचे सेवन करू शकता.
सब्जा बिया पाणी, लिंबाचा रस, आणि गोडीसाठी तुमच्या आवडीचा कोणताही घटक (साखर/गूळ/मध) ही सर्व जिन्नस एकत्र करून एक ताजेतवाने करणारे पेय बनवा आणि याचा आस्वाद घ्या. तुम्ही या बिया स्मूदीज, दही, किंवा फ्रूट सॅलेड मध्ये याचे पोषण वाढवण्यासाठी देखील वापरू शकता.
तिखट पदार्थांमध्ये, सॅलेड, सूप्स, किंव भाज्यांमध्ये घट्टपणा आणि एक सौम्य चव आणण्यासाठी देखील तुम्ही सब्जा बिया वापरू शकता. तसेच या बिया तुम्ही पुडिंग्स, आईस्क्रीम्स, किंवा फालूदा यासारख्या गोड पदार्थांमध्ये देखील वापरू शकता.
सब्जा बियांचे दुष्परिणाम
सब्जा बियांचे जरी अनेक आरोग्यदायी फायदे असले, तरी यापासून असणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल माहिती असणे देखील आवश्यक आहे. सब्जा बियांच्या काही सामान्य दुष्परिणामांमध्ये खालील प्रकारांचा समावेश असू शकतो:
- लहान मुले किंवा वयोवृद्ध व्यक्तींद्वारे जर पूर्णपणे न भिजलेल्या सब्जा बिया प्यायल्या गेल्या तर त्या घशात अडकण्याची आणि श्वास गुदमरणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- सब्जा बियांच्या अनेक दुष्परिणामांपैकी एक म्हणजे अॅलर्जीचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो, म्हणजेच खाज सुटणे, पित्त उठणे, किंवा श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण होणे यासारखी लक्षणे दिसायला लागू शकतात. सुरुवातीला तुम्ही कमी प्रमाणात याचे सेवन करून तुमचे शरीर याला कसा प्रतिसाद देते याचे निरक्षण करणे फायद्याचे ठरेल.
- काही औषधे जसे की रक्त पातळ होण्याची औषधे किंवा डायबेटीज संबंधी औषधे सुरू असल्यास सब्जा बिया त्यासोबत प्रतिक्रिया करू शकतात, त्यामुळे नियमित याचे सेवन करण्याआधी, विशेषतः जर तुम्हाला आरोग्यासंबंधी काही तक्रारी असतील किंवा तुम्ही गरोदर असाल किंवा स्तनपान देत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
- महिलांमध्ये सब्जा बियांचे दुष्परिणाम लक्षणीय आहेत कारण या बियांचे अती सेवन केल्याने काही महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते आणि यामुळे त्यांच्या मासिक पाळीवर विपरीत परिणाम होतो.
निष्कर्ष
सब्जा बियांचे असंख्य फायदे आहेत जसे की पचन संस्था सुधारण्यापासून ते हायड्रेशन, रक्तदाब नियंत्रण आणि मानसिक आरोग्य सुधारणे. तथापि, तुम्ही यांचे सेवन प्रमाणात केले पाहिजे आणि यांचे संभाव्य दुष्परिणाम देखील लक्षात घेतले पाहिजे. योग्य प्रमाणात सब्जा बियांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने, तुम्ही तुमचे आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारू शकता. जर तुम्हाला डायबेटीज असेल तर सब्जा बिया तुमच्यासाठी सुपरफूड आहेत. दरम्यान, तुम्ही मेट्रोपोलिस हेल्थकेअर सोबत एचबीए1सीची तत्काळ चाचणी बूक करू शकता जेणेकरून तुम्हाला लगेचच आणि अचूक परिणाम मिळतात आणि तुमचे आरोग्याची आणखीन प्रभावीपणे काळजी घेतली जाऊ शकते. आमचे तज्ज्ञ फ्लेबोटोमिस्ट्स आणि घरी येऊन चाचणी करण्याची सुविधा तुमचा निदानासंबंधी अनुभव सर्वोत्तम असल्याचे सुनिश्चित करतात, तुमची चाचणी आजच बूक करा!









