Language
अतिशय गुणकारी जिऱ्याचे पाणी वापरुन वजन कमी करा: याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
Table of Contents
आरोग्य आणि स्वास्थ्य या दुनियेत तुमचे स्वागत आहे! जिरे, हा केवळ एक मासल्याचा प्रकार नाही, तर आरोग्यदायी फायद्यांचे भंडार आहे. संशोधनातून समोर आले आहे की यामध्ये पचन संस्था सुधारणे, वजन कमी करणे, अॅसिडिटी नियंत्रित करणे ई. सारखे आरोग्य सुधारणारे गुण आहेत.
या विस्तृत गाईड मध्ये आपण तुमच्या संपूर्ण आरोग्य वाढवणाऱ्या नैसर्गिक अमृत, म्हणजेच जिऱ्याचे पाणी प्यायल्याने होणारे असंख्य फायदे बघणार आहोत.
जिऱ्याचे पाणी आणि त्याचे 11 फायदे
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये चव वाढवण्यासोबतच जिऱ्याच्या पाण्याचे असंख्य फायदे खालील प्रमाणे आहेत:
पचन संस्था सुधारते
जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे या यादीतील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन संस्था सुधारणे होय. जिऱ्यातील थायमोल आणि इतर महत्त्वाचे तेल पचनासाठी सहाय्यक एन्झाईम्स बाहेर पडण्याचे प्रमाण वाढवतात. जिऱ्याच्या पाण्यामुळे पित्ताशयातील पित्त बाहेर पडण्याचे प्रमाण देखील वाढते, ज्यामुळे शरीराला फॅट पचवणे सोपे जाते आणि इतर पोषक तत्त्वे आतड्या चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात. म्हणजेच शरीराला अपचन आणि ब्लोटिंग यापासून आराम मिळतो.
वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय
ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा सर्व व्यक्तींसाठी जिऱ्याचे पाणी पिणे उत्तम पर्याय असू शकतो. जिऱ्याचे पाणी शरीरातील हानिकारक अणूंवर नियंत्रण ठेवून निरोगी पेशींचे संरक्षण करते, त्यामुळे आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते आणि गंभीर आजार होण्याचा धोका कमी करते.
निरोगी त्वचा आणि केस
जिऱ्याच्या पाण्याच्या फायद्यांमध्ये सौन्दर्य वाढवणे हा देखील एक फायदा आहे. त्वचेसाठी जिऱ्याच्या पाण्याचे फायदे अप्रतिम आहेत कारण हे एक नैसर्गिक डीटॉक्सीफायर आहे, हे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकतात. तसेच, जिऱ्याचे पाणी कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि सेलेनियम यासारख्या खनिजांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे तुमची त्वचा तजेलदार होते.
तसेच यामध्ये अॅंटीऑक्सीडंट गुणधर्म आसल्यामुळे, जिऱ्याचे पाणी वय वाढण्याच्या आणि मुरूम याच्या लक्षणांना कमी करते. जिऱ्याच्या पाण्याने केसांचे कूप मजबूत होतात, ज्यामुळे केसांचे गळणे कमी होते आणि केस दाट होण्यामध्ये मदत होते.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम
तुमच्या धमन्यांमधील फॅटी अॅसिड्सचे (फॅट्स) ऑक्सीडेशन तुमच्या धमन्या ब्लॉक करू शकतात आणि हृदयाचे आजार उद्भवू शकतात. जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्याने कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते, रक्तदाब कमी होतो आणि रक्तातील गुठळ्या तयार होण्यापासून बचाव होतो, पर्यायाने हृदयाचे आरोग्य सुधारते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते
जिऱ्याचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते कारण हे पाणी इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर करते आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अचानक कमी किंवा जास्त होण्याचा धोका कमी होतो.
कॅन्सरचा धोका कमी होतो
डीएनएच्या ऑक्सीडेशन मुळे कॅन्सर होऊ शकतो. जिऱ्याच्या पाण्यातील शक्तिशाली अॅंटीऑक्सीडंट्समध्ये अॅंटीकॅन्सर गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाले आहे, जे कॅन्सर पेशींची वाढ कमी करतात आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.
अॅसिडिटी पासून आराम मिळतो
जिऱ्याचे पाणी एक नैसर्गिक अॅंटासिडचे काम करते, जे पोटाच्या आतील थर शांत करून अॅसिडिटी, छातीतील जळजळ, आणि शरीरातील अॅसिडचा उलटा प्रवाह यापासून पासून आराम देते.
अशक्तपणा जाणवत असल्यास गुणकारी
तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर जिऱ्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते कारण जिऱ्याच्या पाण्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास तुमची हिमोग्लोबीन पातळी वाढते आणि थकवा आणि अशक्तपणाची लक्षणे कमी होतात.
पाळीच्या दिवसांमध्ये आणि दुग्धपान अवस्थेमध्ये परिणामकारक
महिलांसाठी त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्ये आणि दुग्धपान अवस्थेदरम्यान जिऱ्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. यातील जळजळ किंवा वेदना रोखण्यास सक्षम गुणधर्मांमुळे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदना कमी होण्यामध्ये मदत होते आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो. तसेच, जिऱ्याच्या पाण्यामुळे तुमच्या गर्भाशयाचे आंकुचन व्यवस्थित होते आणि साचलेले रक्त देखील वाहून जाण्यास मदत होते.
त्याच बरोबर, दुग्धपान देणाऱ्या मातांसाठी देखील हे पाणी फायदेशीर ठरते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जिऱ्याचे पाणी माता आणि बाळाला योग्य पोषण मिळेल हे सुनिश्चित करून जास्त प्रमाणात दूध निर्माण होण्यात मदत करते.
प्रतिकारशक्तीचा आधार
जिऱ्याचे पाणी हे पोटॅशियम आणि लोह याचे उत्तम स्त्रोत आहे आणि या घटकांमुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. जिऱ्याच्या पाण्यामध्ये सी व्हिटॅमिन देखील भरपूर प्रमाणात असते, जे जखम भरण्यामध्ये सहाय्यक असलेले एक अॅंटीऑक्सीडंट आहे. जिऱ्याचे पाणी एक उत्तम अॅंटी-बॅक्टेरियल एजंट आहे जे तुमच्या शरीराला कोणत्याही संसर्गापासून लढण्यामध्ये मदत करते आणि एकूण प्रतिकरशक्ती वाढवते.
जळजळ किंवा वेदना रोखणारे गुणधर्म
जिऱ्याच्या पाण्यामध्ये क्युमिनाल्डिहाइड आणि थायमोक्विनोन नावाचे घटक आहेत ज्यामुळे यामध्ये उत्तम प्रकारचे जळजळ किंवा वेदना रोखणारे गुणधर्म तयार होतात, आणि म्हणून तुमच्या शरीरातील जळजळ कमी होण्यामध्ये मदत होते. जर तुम्हाला संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर जिऱ्याचे पाणी वेदना आणि सूज कमी करण्यामध्ये मदत करते.
जिऱ्याचे पाणी कसे तयार करायचे
जिऱ्याच्या पाण्याचे फायदे मिळवण्यासाठी ते बनवणे अगदी सोपे आहे:
कृती 1:
साहित्य:
1 चमचा जिरे
1 ग्लास पाणी
कृती:
- एका कढईत पाणी उकळून घ्या.
- या पाण्यामध्ये जिरे घाला.
- 5-10 मिनिटे हे मिश्रण उकळू द्या.
- मिश्रण गाळून घ्या आणि थंड होऊ द्या.
- तुमचे जिऱ्याचे पाणी पिण्यासाठी तयार आहे.
कृती 2:
- एका ग्लास मध्ये किंवा भांड्यात एक चमचा जिरे घ्या.
- यामध्ये 1 कप पाणी घाला.
- आता ग्लास किंवा भांडे झाकून ठेवा.
- रात्रभर कमीत कमी 8 तास तरी जिरे पाण्यामध्ये भिजत ठेवा.
- सकाळी, भिजलेल्या जिऱ्याचे पाणी एका कप मध्ये गळून घ्या.
- तुमचे जिऱ्याचे पाणी पिण्यासाठी तयार आहे!
- तुम्ही हे असेच देखील पिऊ शकता किंवा त्यामध्ये लिंबाचा किंचित रस किंवा आणखीन चवीसाठी मधही घालू शकता.
- ताजेतवाने करणारे आणि पौष्टिक असे जिऱ्याचे पाणी प्या आणि तुमचा दिवस उत्साहाने सुरू करा!
या कृती दोन सोप्या पद्धतीने घरच्या घरी जिऱ्याचे पाणी कसे बनवायचे हे सांगतात. तुम्हाला जशी चव आवडते त्याप्रमाणे जिरे आणि पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता.
जिऱ्याचे पाणी दिवसातून कधी घ्यावे
उत्तम परिणामांसाठी, जिऱ्याचे पाणी उपाशीपोटी काहीही खाण्याच्या 30 मिनिटे आधी घेण्याचे सुचवले जाते. यामुळे सर्व पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि याचे पचन संस्थेसाठीचे फायदे द्विगुणित करतात.
जिऱ्याच्या पाण्याचे दुष्परिणाम
सामान्यतः जिऱ्याचे पाणी पिणे सुरक्षित आहे, तरी यामुळे काही व्यक्तींमध्ये सौम्य दुष्परिणाम दिसू शकतात. जिऱ्याच्या पाण्यामुळे होणारे काही दुष्परिणाम खलील प्रमाणे आहेत:
- अॅलर्जी: जर तुम्हाला जिऱ्याच्या पाण्याची, जिरे किंवा तत्सम वनस्पतींची अॅलर्जी असेल, तर तुम्हाला स्वतःमध्ये खाज सुटणे, सूज येणे, किंवा श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
- पचन संबंधी समस्या: जिऱ्याचे अती सेवन केल्याने अपचन त्याचबरोबर ब्लोटिंग, गॅस होणे किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.
- गरोदरपणात आणि स्तनपान अवस्था: गरोदरपणात आणि स्तनपान अवस्थेमध्ये जिऱ्याचे अती सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकते आणि दूध निर्माण होण्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. गरोदरपणात आणि स्तनपान अवस्थेमध्ये हे जिऱ्याचे पाणी पिण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर याचे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात.
निष्कर्ष
जिऱ्याचे पाणी म्हणजे पचन संस्था सुधारण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढण्यापर्यंत किंबहुना याही पेक्षा जास्त असंख्य फायदे देणारा एक नैसर्गिक उपाय आहे. हे साधे पण सक्षम अमृत तुमच्या दैनंदिन आहारात वापरल्याने, तुम्ही उत्तम आरोग्याच्या दिशेने तुमच्या प्रवासाची सुरुवात करू शकता. उत्तम आरोग्याकडे नेणारा हा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी आत्ताच मेट्रोपोलिस लॅब्स मध्ये तुमची होम-बुकिंग व्हिजिट बूक करा. मेट्रोपोलिसच्या वेगवेगळ्या निदान सेवांसह, आम्ही तुमचे आरोग्य सर्वतोपरी ठेवण्याचे सुनिश्चित करतो. अधिक माहितीसाठी आणि सर्वोत्तम आरोग्यासाठी व्यक्तिगत उपयांसाठी आमच्या संसाधनांबद्दल नक्की माहिती करून घ्या.









