Language
ESR चाचणी: सामान्य श्रेणी आणि ESR स्तर वाढण्याची कारणे
Table of Contents
एरिथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट (ESR) टेस्ट ही नियमित रक्त चाचण्यांपैकी एक आहे. ESR रक्त तपासणी मध्ये तुमच्या रक्तातील लाल रक्तपेशी किती वेळात एखाद्या टेस्ट ट्यूबच्या तळाशी जाऊन बसतात हे बघितले जाते. लाल रक्तपेशी सर्वसाधारणपणे हळू हळू तळाशी जाऊन बसतात. तथापि, तुमच्या चाचणीमध्ये जर या पेशी लवकर खाली साचल्या, तर याचा अर्थ ESR स्तर वाढलेला आहे, म्हणजेच ही तुम्हीाला एखादा आजार झालेला असल्याची खूण आहे, जे ESR स्तर जास्त असल्याचे लक्षण आहे.
ESR स्तर वाढण्याची कारणे समजून घेण्याआधी, ESR टेस्ट म्हणजे काय आणि ही कशाप्रकारे उपयुक्त आहे हे जाणून घेऊ.
ESR चाचणी म्हणजे काय?
ESR म्हणजे “एरिथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट.” ESR रक्त तपासणीला “सेड रेट टेस्ट” असे देखील म्हणतात. ESR टेस्टमध्ये तुमच्या रक्तातील एरिथ्रोसाईट्स (लाल रक्तपेशी) किती वेळात टेस्ट ट्यूबच्या तळाशी जाऊन बसतात हे तपासले जाते.या टेस्टमध्ये रक्तपेशी तळाशी जाऊन बसण्यास मदत करणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या प्रोटीनची पातळी तपासली जाते. हे प्रोटीन स्तर तुमच्या शरीरातील दाहक स्थितीविषयी माहिती देतात.
ESR स्तर जास्त असणे म्हणजे काय?
जेव्हा तुम्हीी आजारी असता किंवा तुम्हीाला एखादा संसर्ग झालेला असतो, तेव्हा तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती त्या संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिक्रिया देते आणि तसे केल्यामुळे, शरीरातील या प्रोटीन्सची पातळी वाढते. हे प्रोटीन्स वाढले की त्यामुळे लाल रक्तपेशी एकत्र येऊ लागतात, ज्यामुळे त्यांचा तळाशी सचण्याचा वेग वाढतो. (टिशकोव्स्की, K. et al., 2022). म्हणजेच, ESR स्तर जास्त असणे म्हणजे तुमचे शरीर सध्या एखाद्या आजाराशी किंवा संसर्गाशी लढते आहे.
काही गंभीर आजारांसाठी जसे की:
- दाहक आजार
- स्व-रोग
- मूत्रपिंडाचे गंभीर आजार
- संधिवात
ESR टेस्ट्स मध्ये या अजारांची पातळी आणि त्यातील सुधारणेचे निरीक्षण केले जाते.
तथापि, “एरिथ्रोसाईट सेडीमेंटेशन रेट” किंवा ESR चाचणीही कोणत्याही आजाराचे निदान नाही. या टेस्ट सोबत आणखीन काही टेस्ट्स केल्या जातात आणि लक्षणे तपासली जातात ज्यामुळे शरीरातील दाह वाढल्याचे आणि परिणामी आजार उद्भवल्यासंबंधी तपासणी केली जाते.
डॉक्टर ESR चाचणी करण्याचे कधी सुचवतात?
जर डॉक्टरांना जाणवले की तुम्हीाला काही संसर्ग झाला आहे, तर ते ESR चाचणीकरण्याचे सुचवू शकतात. तथापि, ESR टेस्ट्स नियमित रक्त चाचण्यांचा एक भाग असल्यामुळे या वेगळ्याने सुचवल्या जात नाहीत.
ESR स्तर जास्त असल्याची कोणती लक्षणे आहेत?
ESR स्तर हे आजार आणि संसर्गाचे दर्शक आहेत; त्यामुळे ESR स्तर वाढलेला असताना खालील लक्षणे दिसू शकतात:
- डोकेदुखी
- ताप
- सांधेदुखी
- भूक न लागणे
- असामान्यरित्या वजन कमी होणे किंवा वाढणे
- अशक्तपणा
ही लक्षणांची यादी न संपणारी आहे. ESR जास्त असल्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात आणि डॉक्टरच त्याचे चांगल्याप्रकारे मूल्यांकन करू शकतात.
ESR पातळी सामान्यतः किती असावी?
ESR स्तर जास्त असणे म्हणजेच तुमच्या रक्तातील प्रोटीनचे स्तर जास्त आहेत आणि ज्यामुळे लाल रक्तपेशी लवकर एकत्र येऊ लागतात.
ESR चाचणीमध्ये ट्यूबच्या वरच्या बाजूला असलेल्या प्लाझ्मा आणि तळाशी जाऊन बसलेल्या लाल रक्तपेशींमधील अंतर एक तासानंतर किती असेल हे मिलीमीटर (मिमि) मध्ये मोजले जाते.
- 0 ते 15 मिमि/तास 50 पेक्षा कमी वय असलेल्या पुरुषांसाठी
- 0 ते 20 मिमि/तास 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांसाठी
- 0 ते 20 मिमि/तास 50 पेक्षा कमी वय असलेल्या महिलांसाठी
- 0 ते 30 मिमी/तास 50 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी
ESR स्तर वाढण्याची काय कारणे असू शकतात?
ESR स्तर जास्त असण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील जास्त प्रमाण दाहक आजारांचेच असते, जे प्रतिकारशक्तिची प्रतिक्रिया बळावतात आणि ESR जास्त असण्याची लक्षणे दर्शवतात. त्यातील काही खाली देत आहोत:
दाहक संक्रमण ज्यामुळे रक्त प्रभावित झाले आहे, म्हणजेच, शरीर प्रणालीतील दाहक संक्रमण. यामध्ये हाडे, हृदय, त्वचा, फुफ्फुस, ई.ला प्रभावित करणाऱ्या संक्रमणांचा समावेश आहे.
- ऊतकांना दुखापत किंवा इस्केमिया (ऊतकांना कमी रक्तपुरवठा होणे)
- आघात करणाऱ्या घटना किंवा अपघात
- ल्युकेमिया, मायलोमा, लिम्फोमा, ई. प्रकारचे कॅन्सर
- मधुमेह
- हृदयासंबंधी आजार
- मूत्रपिंडासंबंधी आजार
- एथेरोस्क्लेरोसिस सारखे रक्तवाहिन्यांचे आजार, उच्च रक्तदाब, ई.
- लठ्ठपणा
- थायरॉईड
- संधीवाताचा ताप
- स्व-रोग जसे ल्युपस, सांधेदुखी, ई.
ही कारणांची यादी देखील न संपणारी आहे. ESR जास्त असल्याची इतरही कारणे असू शकतात जी लिंग, मेडिकल हिस्ट्री, आणि एकंदर आरोग्य यावर अवलंबून असतात.
कुटुंब नियोजनासाठी घेतली जाणारी औषधे, जीवनसत्त्व पूरक औषधे, कॉर्टिसोन, मेथिलडोपा, क्विनिन आणि थियोफिलिन यामुळे देखील तुमच्या ESR टेस्टच्या परिणामांवर प्रभाव पडू शकतो.
काही परिस्थितींमध्ये, जसे की गरोदरपणात, वृद्धत्व आणि अशक्तपणा, यामुळे देखील ESR स्तर वाढू शकतो. त्यामुळे, ESR स्तर वाढण्याची लक्षणे फक्त एखाद्या आजारमुळे किंवा संक्रमणामुळेच निर्माण होतात असे गरजेचे नाही.
माझे ESR स्तर जर जास्त असतील तर मी काय करू शकतो?
तुमच्या ESR टेस्टचे परिणाम मिळाल्यानंतर सर्वात योग्य म्हणजे तुमच्या डॉक्टर कडून तुमचे लिंग, वय, आणि एकंदर आरोग्य यावर आधारित अचूक निदान मिळेपर्यंत वाट पाहणे. फक्त तुमचा ESR स्तर जास्त असणे हे तुमच्या शरीरातील आजार किंवा एखाद्या अवस्थेचे अचूक मूल्यांकन असू शकत नाही.
डॉक्टर अचूक मूल्यांकन करू शकतील यासाठी त्यांना तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल आणि तुम्हीी कोणती औषधे घेत असाल तर त्यासंबंधी सविस्तर माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण काही पूरक औषधे ESR स्तर वाढण्यासाठी कारणीभूत असू शकतात. ESR च्या सामान्य पातळीमध्ये होणारा बदल हा प्रयोगशाळा, टेस्ट करून घेणारी व्यक्ति, आणि लिंग यावर अवलंबून असतो.
एवढेच नाही, तर ESR पातळी सामान्य असणे हे फक्त दाहक आजारांचेच नाही तर गरोदरपणाचे किंवा पाळी आल्याचे देखील सूचक असू शकते, आणि म्हणूनच डॉक्टरांना योग्य निदान करण्यासाठी फक्त ESR पातळी न तपासता इतर चाचण्या करणे देखील गरजेचे ठरते. अचूक निदान करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हीाला अजून काही टेस्ट्स करण्याचे देखील सुचवू शकतात.









