Language
प्रोलॅक्टिन पातळी: वाढलेली प्रोलॅक्टिन लेवल कमी करण्यासाठी 7 अत्यंत विश्वसनीय उपाय
प्रोलॅक्टिन हे पिट्यूटरी ग्रंथीद्वारे निर्मित होणारे एक हार्मोन आहे. या हार्मोनामुळे स्तनांमध्ये दूध तयार होते. प्रोलॅक्टिन हा हार्मोन स्तनपान, लैंगिक क्रिया, आणि शारीरिक विकासास महत्त्वपूर्ण आहे. तथापि, रक्तातील प्रोलॅक्टिनची लेवल जास्त असेल तर, यामुळे स्तनाचा कॅन्सर, वंध्यत्व, आणि लठ्ठपणा आणि इतर दुष्परिणाम देखील उद्भवू शकतात.
तुमच्या शरीरातील प्रोलॅक्टिन पातळी वाढली असल्यास, तर तुमच्या शरीरात कोणत्यातरी हार्मोनल विसंगती किंवा तत्सम परिस्थिती निर्माण होत आहेत (जसे की महिलांमध्ये PCOS). सीरम प्रोलॅक्टिन टेस्ट्स तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रोलॅक्टिन लेवल अचूकपणे सांगू शकते. प्रोलॅक्टिन लेवल महिला आणि पुरुष दोघांच्याही शरीरात जास्त होऊ शकते. ताण, नैराश्य, अस्वस्थता, आणि प्रोलॅक्टिनोमा या स्थिती प्रोलॅक्टिन लेवल वाढण्यासाठी कारणीभूत असू शकतात.
प्रोलॅक्टिन तुमच्या मेंदूच्या विविध भागांमध्ये संदेश पाठवून तुमचे झोपेचे चक्र नियमित करण्यात मदत करते. असे म्हणतात की गरोदर स्त्रियांमध्ये त्यांच्या प्रत्येक तीन महिन्यांच्या कालावधीत प्रोलॅक्टिनचे प्रमाण 8 ते 10% वाढू शकते. त्यामुळे, जर महिलांना या काळात पुरेशी झोप नाही मिळाली तर त्यांच्या शरीरातील ताण वाढतो, आणि ज्यामुळे प्रोलॅक्टिन लेवल देखील वाढते.
प्रोलॅक्टिन लेवल कमी करण्यासाठी 7 उपाय
ग्लुटन टाळा
आहारातून ग्लुटन कमी करून तुम्ही तुमची प्रोलॅक्टिन लेवल कमी करू शकता, कारण ग्लुटनमुळे प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी वाढू शकते. गहू, राय आणि सातू यासारख्या धान्यांमध्ये ग्लुटन असतो, जो काही लोकांमध्ये प्रोलॅक्टिन पातळी वाढवू शकतो, जे खाल्ल्यावर शरीरातील दहकतत्व वाढू शकते. यामुळे प्रोलॅक्टिन लेवल वाढते आणि हायपोथालेमस मध्ये डोपामाईन निर्माण होण्यामध्ये बाधा उत्पन्न होते. त्यामुळे, ग्लुटन खाणे टाळणे हा प्रोलॅक्टिन लेवल कमी करण्यासाठीचा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.
मद्यपान टाळा
मद्यपानामुळे डोपामाइनच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे प्रोलॅक्टिन लेवल वाढू शकते. निरोगी व्यक्तींना जास्त प्रमाणात मद्यपान करणे तसे ही वर्ज्य आहेच, तरी तुमची प्रोलॅक्टिन लेवल जास्त असल्यास तुम्ही तुमचे आवडते पेय पिणे टाळायला हवे. जर तुमची प्रोलॅक्टिन लेवल वाढली असेल तर तुमच्या आवडीच्या जेवणासोबत क्वचित प्रसंगी बियर प्यायली तर चालेल का हे तुमच्या डॉक्टरांना विचारा.
ई जीवनसत्त्व आणि बी6 जीवनसत्त्वाचे पूरक सेवन
ज्यांची प्रोलॅक्टिन लेवल कमी असल्याचे आढळले आहे त्यांना बऱ्याचदा डॉक्टर ई जीवनसत्त्व आणि बी6 जीवनसत्त्व घेण्याचा सल्ला देतात, कारण बी6 जीवनसत्त्व डोपामाईन निर्मितीसाठी आवश्यक असते. ई जीवनसत्त्वामध्ये नैसर्गिकरित्या रक्तातील प्रोलॅक्टिन लेवल कमी करण्याची क्षमता असते.
रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे
रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवल्याने तुमची प्रोलॅक्टिन लेवल कमी होऊ शकते. यासंबंधी केल्या गेलेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की ग्लुकोज असंवेदनशीलतेमुळे फॅटी एसिड्सची पातळी वाढते आणि इन्सुलिन रिसेप्टर्सची कार्यक्षमता कमी होऊ शकते, किंवा इन्सुलिन एकात्रीकरणामध्ये अडचणी येतात आणि यामुळे प्रोलॅक्टिन लेवल वाढते.
गोड पेय पिणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. तसेच, तुमच्या आहारात प्रोटीन आणि फायबरचे योग्य प्रमाण असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहील आणि तुमची प्रोलॅक्टिन लेवल कमी होईल. प्रोटीन आणि फायबरच्या योग्य प्रमाणासह काही आहारातील पदार्थ ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहू शकेल.
खाद्यपदार्थ:
- ब्रोकोली
- लाल भोपळा आणि त्याच्या बिया
- सीफूड
- भेंडी
- पीनट बटर
- बीन्स
- डाळी
- बेरीज
- केल
- जवस
जास्त थकवा आणणारे व्यायाम टाळा
प्रोलॅक्टिन लेवल जास्त असणाऱ्या व्यक्तींनी जास्त थकवा आणणारे व्यायाम करणे टाळावे. प्रोलॅक्टिन लेवल कमी ठेवण्यासाठी व्यायाम करताना लक्षपूर्वक आणि हळू हालचाली करणे एक उत्तम उपाय आहे. प्रोलॅक्टिन लेवल जास्त असल्यास जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
ताण घेणे टाळा
शांत राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे शरीर कमी प्रमाणात प्रोलॅक्टिन हार्मोन तयार करेल. जर तुम्ही ताण घेतलात, तर शरीरातील वाढलेल्या कोर्टिसोल लेवल मुळे तुमच्या शरीरातील प्रोलॅक्टिन लेवल देखील वाढते. ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, जसे रात्रीची झोप पूर्ण घेणे, वेळेवर आणि पोषक आहार घेणे, ध्यान करणे, आणि हळू हालचालीचे व्यायाम करणे, तुमचा तणाव नियंत्रित करेल, ज्यामुळे तुमच्या वाढलेल्या प्रोलॅक्टिन लेवल ला नियंत्रित करण्यात मदत होईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्त तणावाला सामोरे जावे लागत असेल तर काम करताना अधून-मधून छोटे छोटे ब्रेक घ्यायला विसरू नका.
अस्वस्थ वाटेल असे कपडे घालणे टाळा
घट्ट कपडे घालणे टाळणे महत्त्वाचे आहे, विशेषतः तुमच्या शरीरातील प्रोलॅक्टिन लेवल जास्त असताना. कारण अस्वस्थ वाटणारे कपडे घातल्याने तुमचे निप्पल्स अति प्रमाणात उत्तेजित होऊन त्यामुळे प्रोलॅक्टिन हार्मोन तयार होण्याचे प्रमाण वाढते.
निष्कर्ष
प्रोलॅक्टिन हे दूध निर्मितीसाठी आणि महिलांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण हार्मोन आहे. प्रोलॅक्टिन लेवल वाढली तर, वजन कमी करण्यामध्ये अडचण येणे, प्रजनन समस्या, आणि मूड स्विंग्स यासारख्या अनेक समस्या उद्भवतात.
शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित झाले, तर तुमच्या शरीरातील ताण वाढतो आणि कोर्टिसोल लेवल वाढते. बी6 जीवनसत्त्व घेतल्याने हायपोथालेमस मध्ये डोपामाईनचा प्रभाव वाढतो आणि नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातील प्रोलॅक्टिन लेवल कमी होते. लठ्ठपणा हा आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे प्रोलॅक्टिन लेवल वाढते. नियमित व्यायाम आणि पोषक अन्न घेणे हे लठ्ठपणाशी लढण्याचे उत्तम उपाय आहेत.
निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील प्रोलॅक्टिन लेवल स्वस्थ ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि नियमित दिनचर्या पाळणे अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते. आशा आहे की या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रोलॅक्टिन लेवल संतुलित ठेवण्यामध्ये मदत होईल. तुमच्या प्रोलॅक्टिन लेवल संबंधी कोणतीही शंका असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तसेच, टेस्ट करून घेण्यासाठी, मेट्रोपोलिस हेल्थकेअरला संपर्क करा.









